ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. आपल्या मधुर, सुरेल आणि भावस्पर्शी आवाजाने त्यांनी भारतीय संगीतविश्व समृद्ध केलं. हिंदी, मराठीसह अनेक प्रादेशिक भाषांतील त्यांच्या अजरामर गीतांनी अनेक पिढ्यांच्या भावविश्वावर अधिराज्य गाजवलं.